Share

मराठा समाजाच्या बैठकीत अशोक चव्हाणांना पदावरून हटविण्याची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई:- शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आज राज्यव्यापी बैठक बोलावली होती. या बैठकीला मराठा समाजाच्या पहिल्या फळीतील सर्व नेत्यांना बोलावण्यात आलं होतं. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात आतापर्यंत नीट बाजू मांडण्यात आली नाही. 25 जानेवारीपासून अंतिम सुनावणी आहे. जर सरकारची हीच भूमिका राहिली तर मराठा समाजाबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारला माहिती देण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती असं विनायक मेटे यांनी सांगितलं आहे.

आज मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत 10 महत्त्वाच्या मुद्द्यांवर ठराव पास झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीला विनायक मेटे, राजन घाग, माजी आयएएस निर्मलकुमार देशमुख, भाई राऊत, एड.श्रीराम पिंगळे ऊपस्थित होते. यावेळी एक मराठा लाख मराठाची घेषणा देत बैठकीला सुरुवात झाली होती. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या पदावरून काढून अजित पवार, एकनाथ शिंदे ,जयंत पाटील यांना जबाबदारी द्यावी अशी प्रमुख मागणी यावेळी मराठा समजाकडून करण्यात आली.

दरम्यान, पवारांनी देशातील इतर गोष्टींमध्ये लक्ष घातलं. पण मराठा आरक्षणाकडे मात्र दुर्लक्ष केलं, असा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे. 25 जानेवारीपूर्वी त्यांनी लक्ष घालावं. सगळ्यांना एकत्र आणत नवी रणनिती आखावी, अशी मागणी मेटे यांनी केली आहे. मराठा समाजातील नेते एकत्र आले नाहीत, तर समाजाचं नुकसान होणार असल्याचं मत मेटे यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!