Share

दबंगगिरी; चिठ्ठी लिहून पोलिसाला धमकी देणारा आरोपी पसार

Published On: 

🕒 1 min read

बीड : बीड जिल्ह्यात माथेफिरुंची दबंगगिरी वाढल्याचे चित्र दिसत आहे. एका घटनेत चक्क पोलिसाला धमकी देत माथेफिरू पसार झाला आहे. पोलीस अंमलदाराच्या घरावर दगडफेक करुन दुचाकी जाळण्याचा प्रयत्न करत धमकीची चिठ्ठी फेकून पसार झालेला आरोपी २४ तास उलटूनही मोकळाच आहे. ३० रोजी रात्री साडेअकरा वाजता शिंदेनगर परिसरात ही घटना घडली होती. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

शिवाजीनगर ठाण्यातील पोलीस नाईक जालिंदर बनसोडे यांनी मारहाण प्रकरणात १५ मार्च रोजी शिवसेना पदाधिकारी संदिपान बडगे व अभिषेक पवळ या दोघांना ताब्यात घेतले होते. ठाण्यात आणल्यानंतर संदिपान बडगेने मद्यधुंद अवस्थेत बनसोडे यांना शिवीगाळ केली होती. या प्रकरणी शहर पोलिसांत शासकीय कामकाजात अडथळा, ॲट्रॉसिटी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

दरम्यान, ३० रोजी रात्री साडेअकरा वाजता अज्ञात हल्लेखोराने बनसोडे यांच्या घरावर दगडफेक केली. यात खिडकीचा काच तुटला तर गॅलरीत दगडांचा खच पडला. शिवाय दुचाकी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला. एका चिठ्ठीतून हल्लेखोराने बनसोडे यांच्यासह कुटुंबास टोकाची धमकी दिली होती. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संदिपान बडगे हा सध्या कारागृहात आहे, हल्लेखोर त्याचाच हस्तक असल्याचे बनसोडे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!