Share

दिल्ली कॅपिटल्सला तगडा झटका;अनुभवी खेळाडू दुखापतग्रस्त

Published On: 

दुबई- इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील १९वा सामना आज (५ ऑक्टोबर) दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे. दोन्ही संघाचा हा या हंगामातील ५वा सामना आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ७.३० वाजता सुरुवात होईल.

मागील २ सामन्यात विजय मिळवलेला बेंगलोर संघ आजच्या सामना जिंकत विजयाची हॅट्रिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसेल. तर दिल्ली संघदेखील हंगामातील चौथा सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये दिल्लीचा अमित मिश्रा दुसऱ्या स्थानी असून स्पर्धेच्या इतिहासात तो सर्वात यशस्वी फिरकीपटूही आहे. हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे तो आरसीबीविरुद्ध खेळू शकणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

शारजाह मैदानावर झालेल्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना अमितच्या बोटाला दुखापत झाली होती.आता मिश्राच्या जागी दिल्ली संघात अक्षर पटेलला संधी मिळण्याचे जवळपास निश्चित आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!