उत्तर प्रदेश : भारत सरकारनं सोमवारी चीनशी संबंधित ५९ अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. चिनी सैन्याने लडाखमधील सीमेवर वाढवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि भारतानं राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव या ५९ चिनी अॅपवर बंदी घातली. आता ते अॅप सर्वांनी डिलीट करावे यासाठी चिनी अॅप डिलीट करणाऱ्याला मास्क मोफत वाटण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये शालेय शिक्षण राज्यमंत्री अनुपमा जैस्वाल यांनी ही मोहीम सुरू केली आहे. चिनी अॅप डिलीट करणाऱ्यांनी मी मोफत मास्क देणार असल्याचे जैस्वाल यांनी सांगितलं. भाजपाच्या महिला मोर्चाच्या मदतीनं ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.
दरम्यान , भारत सरकारने चिनी मोबाईल अॅप कंपन्यांवर केलेल्या कारवाईबाबत प्रथमच अमेरिका सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे. या बंदीला अमेरिकेनंही समर्थन दिलं आहे. ‘भारताने देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे पाऊल उचलले असून या निर्णयामुळे भारताच्या एकता आणि राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी मिळेल, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी म्हटलंय.
बंदी घालताना भारत सरकारने काय म्हटलं?
भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचं हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९अ च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.
भारताने 59 चायना अॅपवर बंदी घातल्यानंतर अमेरिका सरकारची पहिली प्रतिक्रिया…
पुणे : सौम्य लक्षणे असणार्या कोरोनाग्रस्तांवर होणार घरीच उपचार
#TikTok : संसर्ग आधीच झाला, सरकारने TikTok वर बंदी घालायला खूप उशीर केला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

