वॉशिंग्टन – भारत सरकारनं सोमवारी चीनशी संबंधित ५९ अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. चिनी सैन्याने लडाखमधील सीमेवर वाढवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि भारतानं राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव या ५९ चिनी अॅपवर बंदी घातली. आता, भारत सरकारने चिनी मोबाईल अॅप कंपन्यांवर केलेल्या कारवाईबाबत प्रथमच अमेरिका सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे. अमेरिकेने भारत सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
या बंदीला अमेरिकेनंही समर्थन दिलं आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी या निर्णयाचे समर्थन करताना, भारताने देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे पाऊल उचलले असून या निर्णयामुळे भारताच्या एकता आणि राष्ट्रीय सुरक्षेला बळकटी मिळेल, असे पॉम्पिओ यांनी म्हटलंय. चीनच्या कम्युनिष्ट पक्षाची क्रुरता जगभरात परिणाम करते, त्यामुळेच सर्विलांस स्टेटचा धोका ओळखूनच भारताने चीनी अॅपवर बंदी घातलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत, असेही अमेरिकेने म्हटले आहे.
दुसरीकडे, भारताच्या या निर्णयानंतर अमेरिकेच्या काही खासदारांनी शॉर्ट व्हिडीओ शेअरिंग अॅप्सला देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका असल्याचं म्हणत भारतासारखंच पाऊल उचलण्याचं आवाहन केलं आहे. रिपब्लिकन सिनेटचे सदस्य जॉन कॉर्निन यांनी ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्ताला टॅग केलं आहे. “हिंसक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने टिकटॉक आणि इतर डझनभर इतर अॅप्सवर बंदी घातली आहे,” असंही त्यांनी यासोबत म्हटलं आहे.
“चीन सरकार स्वत:च्या उद्दिष्टांसाठी टिकटॉकचा वापर करत आहे. अमेरिकन कॉंग्रेसमध्ये अशी किमान दोन विधेयकं सध्या प्रलंबित आहेत, त्यामध्ये सरकारच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या फोनवर टिकटॉक वापरण्यास बंदी घालण्याचं म्हटलं आहे,” असं गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी असं म्हटलं होतं.
दरम्यान , भारत सरकारने केलेल्या या कारवाईबाबत चीनच्या पररष्ट्र मंत्रालयचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, भारत सरकारने केलेल्या कारवाईमुळे चीन खूप चिंतीत आहे. आम्ही या परिस्थितीला दुजोरा देत आहोत. या संदर्भातील माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट करून दिली.
कोरोनाची कॉलर ट्यून बंद करा; प्रकाश आंबेडकरांच्या नंतर कॉंग्रेस आमदाराचीही मागणी
लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेलेल्यांसाठी आता मनसे मैदानात…
आता NaMo अॅप देखील बंद केले पाहिजे, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

