नवी दिल्ली : केंद्र सरकारने भारताच्या सुरक्षिततेला धोका ठरू शकणाऱ्या 59 चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाऱ्या चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे.
#TikTok : अॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ निर्णय
देशात टिकटॉकचे 20 कोटींपेक्षा जास्त युझर्स आहेत. गूगल प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरमधील टॉप 10 अॅप्सपैकी एक होतं. सरकारने बंदी घातलेल्या इतर अॅप्सपैकी बहुतांश अॅप अजूनही प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत. लवकरच हे अॅप्स देखील प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरुन हटवले जातील. यानंतर कोणत्याही नव्या युझरला हे अॅप डाऊनलोड करता येणार नाही.
I think the Central government is late to take this step. These mobile applications have already spread the 'infection': Jharkhand Chief Minister Hemant Soren https://t.co/Nb4vjlKZJL pic.twitter.com/KitRzw07FX
— ANI (@ANI) June 29, 2020
सरकारच्या या निर्णयावर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी, केंद्र सरकारने हे पाऊल उशीरा उचललं असं म्हटलं आहे. वृत्तसंस्था एएनआयच्या वृत्तानुसार, 59 चिनी अॅप्सवर घातलेल्या बंदीबाबत प्रतिक्रिया देताना “मला वाटतं सरकारने हे पाऊल उचलायला उशीर केला, कारण या अॅप्सचा संसर्ग आधीच झाला आहे” असं हेमंत सोरेन म्हणाले.


