Share

नांदेड विदयापीठाच्या पदवी व पदव्युत्तर परिक्षा पुढे ढकलल्या

Published On: 

नांदेड :  शहरासह परभणी, हिंगोली तसेच लातूर जिल्हाभरात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड पदवी व पदव्युत्तर (व्यावसायिक व अव्यावसायिक) अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या  आहेत.
या विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाची बुधवारी तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये पदवी व पदव्यत्तर परीक्षा तसेच तारीखांबाबत चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर ज्या पदवी अथवा पदव्युत्तर वर्गाच्या विद्यापीठ अथवा क्लष्टर परिक्षा (व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रम) या 12 एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत. तसेच 15 एप्रिल व त्यापुढील तारखेपासून सुरू होणार होत्या. त्या परीक्षा पूर्णपणे पुढे ढकलण्यात आल्याचा ठोस निर्णय घेण्यात आला. सुधारित वेळापत्रक व परीक्षांच्या तारखा लवकरच विद्यापीठांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालकांनी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पाठवलेल्या पत्राव्दारे कळवण्यात आले आहेत. परिक्षेच्या दिनांकाबाबत पुढील माहिती लवकर कळवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
14 एप्रिलच्या रात्री ८ पासून कडक निर्बंध तसेच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाअंतर्गत विविध अभ्यासक्रमाच्या  2020च्या परीक्षा सहा एप्रिलपासून सुरू झाल्या आहेत. त्या परीक्षा  झाल्या आहेत. केवळ काही अभ्यासक्रमाचे एक ते दोन विषयांचे पेपर होणे बाकी राहिलेले आहे. केवळ त्याच उर्वरित शिल्लक राहिलेल्या विषय पेपरच्या परीक्षा होतील, असे संचालकांनी या पत्रकातून सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!