Share

‘एक पराभव म्हणजे अंत नाही, आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत’ -आ. अंबादास दानवे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : ‘निवडणुकीत जय आणि पराजय हा होतच असतो, पुन्हा पुन्हा तेच जुने पाढे गिरवण्यापेक्षा नवीन पाढे गिरगाव. प्रयत्न करायला कोणी थांबवले आहे. कारण कोणीतरी म्हटलंच आहे कि कोशिश करनेवालोकी कभी हार नही होती. फक्त एकदा पराभव झाला म्हणून आपण या मतदारसंघात खूप मागे पडलो तसा विचार करण्याची गरज नाही. सगळ्यात आधी आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत हे लक्षात ठेवा’. घनसावंगी येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात आमदार अंबादास दानवे बोलत होते. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी कोशिश करने वालों की कभी हार नही होती या कवितेच्या ओळी म्हणून दाखवल्या.

रविवारी (दि.८) परतूर मंठा विधानसभा, जालना, घनसावंगी मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, खासदार संजय जाधव, मंत्री अर्जून खोतकर, माजी आ. शिवाजी चौथे सह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना आमदार दानवे म्हणाले, कोणीही असा विचार केलेला नव्हता कि राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत मिळून शिवसेना सत्ता स्थापन करेल. मात्र असे झाले त्यामुळे पुढे काय होईल याचा विचार आतापासूनच करू नये.

प्रयत्न करत राहणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे पराभवाच्या विचारातून आता बाहेर पडा. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य सरकार काय काम करत आहे त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. कुठली काम करण्यापासून आपल्याला पक्षप्रमुखांनी अडवलेले नाही. घनसावंगी मतदार संघात शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे येणारा काळात विजय कसा मिळवायचा याची चर्चा झाली पाहिजे. घनसावंगी मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. येणाऱ्या काळात याठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकावण्यासाठी तयारीला लागा असे आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!