मुंबई : रणजितसिंह डिसले यांना मिळालेला ग्लोबल टीचर पुरस्कार हा राज्यासह देशाचा गौरव आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शिक्षण क्षेत्रात त्यांच्या संकल्पनांचा समावेश केला जाईल, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
विधानपरिषदेत रणजितसिंह डिसले यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना सभापती रामराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, संसदीय कार्यमंत्री ॲड.अनिल परब, सदस्य विक्रम काळे यांनी या अभिनंदनाच्या प्रस्तावास पाठींबा दिला. यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी डिसले यांनी क्यूआर कोडची अभिनव संकल्पना राबवून शैक्षणिक क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदल घडवून आणल्याचे सांगितले.
मंत्री ॲड.अनिल परब म्हणाले, रणजितसिंह डिसले यांना मिळालेला पुरस्कार हा राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या कार्याची नोंद घेऊन, या संकल्पनेचा शिक्षण क्षेत्रात वापर करुन अभ्याक्रमाचा दर्जा उंचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही ॲड.परब यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा
- ‘आमच्या केवळ एका फोनचा उशीर आहे.’ रजनीकांत – कमल हासन हातमिळवणी करणार?
- ‘चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्र एकच, त्यामुळे मदतीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रादेशिक अन्याय केला नाही’
- …तर मुख्यमंत्र्यांसह इतर एकाही मंत्र्यांला राज्यात फिरू देऊ नका : नितेश राणे
- ‘शेतकरी संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

