🕒 1 min read
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Actress Deepika Padukone) एक मोठा खुलासा केला आहे. दीपिकाने एकदा कॉन्सर्टदरम्यान पुरुषांच्या वॉशरुमचा वापर केला होता. त्यावेळी तिच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्टही (Actress Alia Bhatt) होती, असा मजेशीर खुलासा तिने केला आहे.
सध्या दीपिका पदुकोण तिच्या आगामी ‘गहराइयां’ चित्रपटाच्या प्रमोशनामध्ये व्यस्त आहे. यादरम्यानच तिला एका मुलाखतीत ‘तू कधी कोणत्या परिस्थितीत पुरुषांचे वॉशरुम वापरले आहेस का?’ असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावरच दिग्दर्शक शकुन बत्रा म्हणाले की, ‘१०० टक्के दीपिका हे करु शकते’. तर अनन्या पांडेनेही यावर प्रतिक्रिया देत म्हटले की, ‘जर ते वॉशरूम स्वच्छ असेल तर दीपिका हे नक्कीच करू शकते’.
आणि मग स्वतः दीपिकाने यावर प्रतिक्रिया देत म्हटले की, ‘मी हे केले आहे. जेव्हा मी हे केले तेव्हा माझ्यासोबत शकुनही उपस्थित होता. बर्लिनमध्ये एक कोल्डप्ले कॉन्सर्ट चालू होती. त्यावेळी सुरु असलेल्या गाण्याचा आम्हाला फार कंटाळा आला होता. त्या कॉन्सर्टमध्ये माझ्यासोबत आलिया भट्टही उपस्थित होती.” असे दीपिकाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- औरंगाबाद जिल्हा लसीकरणयुक्त होण्याच्या उंबरठ्यावर..!
- नितीन गडकरींनी केले पुत्रशोक आमदाराचे सात्वन; गडकरींसमोर ते ढसाढसा रडले
- “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपली संमती नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी २४ तासात स्पष्ट करावे अन्यथा…”
- अल्लू अर्जुन फेम ‘पुष्पा’च्या हिंदी रिमेकने गाठला १०० कोटींचा टप्पा
- “नथुराम गोडसेची विचारधारा…” ; तुषार गांधींची वेदनादायक प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
