Share

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण; श्रीनिवास रेड्डींचे निलंबन तीन महिन्यांनी वाढवले

Published On: 

मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल येथील शासकीय निवासात पिस्तूलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांचा निलंबन कालावधी तीन महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी त्यांचा निलंबन कालावधी संपणार होता.

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्तेपूर्वी लहिलेल्या चिठ्ठीत शिवकुमार यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. प्रमुख संरक्षक रेड्डी यांना वारंवार तक्रार करून देखील त्यांनी शिवकुमारला पाठीशी घातल्याचा आरोप होता. या नंतर काहीच तासात नागपुरातून अमरावती पोलिसांच्या पथकाने DCF शिवकुमार याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

आत्महत्या करण्यापूर्वी दीपाली चव्हाण यांनी तीन सुसाईट नोट्स लिहील्या होत्या. त्यात आत्महत्येस विनोद शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी जबाबदार असल्याचे म्हणले होते. एम एस रेड्डी यांनी विनोद शिवकुमार याचे कारनामे वेळीच थांबवले असते तर आत्महत्तेचा प्रसंग ओढावला नसता असेही दीपाली चव्हाण यांनी या नोट्स मध्ये लिहीले होते.

महत्वाच्या बातम्या

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!