Share

Deepak Kesarkar | “तुम्ही लोकांना खोटं सांगत फिरता, त्याामुळे…”; केसरकरांचा ठाकरेंवर हल्ला

Published On: 

मुंबई : सध्या राज्यामधील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. एकनाथ शिंदेंनी राज्यात सरकार स्थापन केल्यापासू शिवसेना पक्ष पूर्णपणे कोलमडून गेला आहे. पुन्हा पक्षाची उभारणी करण्यासाठी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि नेते जोरदार प्रयत्न करत आहेत. तसेच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काल पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावरून शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले दीपक केसरकर ?

तुमची सत्ता गेली म्हणून आज तुम्ही हे करत आहात. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्येही येत नव्हता. सत्ता गेल्यानंतर तुम्ही घरोघर फिरायला लागले आहात, असं म्हणत दीपक केसरकरांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला आहे. केसरकर प्रसार माध्यमांशी बोलत होते, त्यावेळी ते म्हणाले.

आता तुम्ही लोकांना खोटं सांगत फिरता. त्याामुळे आता आम्हालाही खरं सांगत महाराष्ट्रभर फिरावं लागेल. पण आम्ही आमची कामं सांभाळून ते लोकांना सांगू. कामं ठेवून आम्ही आमच्या यात्रा काढणार नाही, असं सांगत केसकरांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

तसेच, शिवसैनिकांना साधी तुमची भेट मिळत नव्हती. आमच्यासारखे ज्येष्ठ आमदार वर्षाच्या समोर रस्त्यावर उभे राहात होते. ही परिस्थिती तुम्ही महाराष्ट्रावर आणली होती, असंही दीपक केसरकरांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!