मारुती सुझुकीच्या प्रत्येक नवीन अपडेटवर लोकांची कायम नजर असते. मारुतीही कधी आपल्या ग्राहकांना निराश होण्याची संधी देत नाही. कारण मारुती आपले मॉडेल्स सतत अपडेट करण्यात गुंतलेली असते. मारुतीची पुढील अपडेटेड कार मारुती स्विफ्ट असू शकते अशी अपेक्षा आहे.
मारुती पुढील वर्षी ऑटो एक्सपोमध्ये या कारचे अनावरण करू शकते. यामध्ये उपलब्ध असलेल्या उत्तम फीचर्ससोबतच ही कार हॅचबॅक लूकमध्येही पावरफुल आणि स्पोर्टी असू शकते. कंपनी सध्या या कारची युरोपियन देशांमध्ये विक्री करत आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेतही या कारची एंट्री होण्याची शक्यता आहे.
इंजिन क्षमता
मारुती सुझुकी स्विफ्ट स्पोर्ट पुढील वर्षी लाँच केली जाऊ शकते आणि त्याचबरोबर नेक्स्ट जेनरेशन मारुती स्विफ्ट देखील लाँच केली जाऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. त्याच वेळी, त्याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, ही कार 1.4-लिटर 4-सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल-इंजिन, तसेच 48V माइल्ड-हाइब्रिड टेक्नॉलजीसह देखील देऊ शकते. या कारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असे दोन्ही पर्याय असू शकतात.
फीचर्स
या कारच्या लूक आणि डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर तिचा लूक अग्रेसिव असू शकतो. आणि भारतीय बाजारपेठेनुसार, त्याच्या फीचर्सबद्दल विशेष काळजी घेतली जाऊ शकते. या कारमधील एलईडी डीआरएल, स्लिम हेडलॅम्प, ब्लॅक आऊट ग्रिल, मल्टी स्पोक अलॉय व्हील्स तसेच स्विफ्ट स्पोर्टच्या आतील भागात लेदरच्या अनेक गोष्टी असू शकतात. जेणेकरून त्याचा स्पोर्टी लूक अधिक खास दाखवता येईल. या कारमध्ये अत्याधुनिक फीचर्सही भरपूर प्रमाणात पाहायला मिळतील.
सेफटी फीचर्स
यात काही शंका नाही की मारुती सुझुकी ही लूक, डिझाइन आणि फीचर्सच्या बाबतीत त्याच्या सेगमेंटमधील सर्वोत्कृष्ट कार आहे पण सुरक्षिततेच्या बाबतीत ती खूप मागे आहे. कंपनीने याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे कारण आता लोक कार खरेदी करताना सेफटी फीचर्सकडेही लक्ष देत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Abdul Sattar | घरात बसून, पडद्याच्या आड बसून चालत नाही, तर …; सत्तारांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- Chandrakant Patil | “…हे विसरलात काय आदित्यजी?”; चंद्रकात पाटलांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
- Tanaji Sawant | “गेले अडीच वर्ष उद्धव ठाकरे फक्त…”, तानाजी सावंतांचे एका बाणात दोन निशाणे
- Abdul Sattar । अरे ला कारे करा, कोणी एक मारली तर तुम्ही चार मारा; अब्दुल सत्तार यांचा कार्यकर्त्यांना सल्ला
- Chandrashekhar Bawankule | “वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गमवण्यास उद्धव ठाकरेच जबाबदार”
- Chandrashekhar Bawankule | “आदित्य ठाकरे हे खोटारडे असून…”; बावनकुळेंचा आदित्या ठाकरेंवर निशाणा
- Ajit Pawar | कार्यकर्त्यांसमोर केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

