🕒 1 min read
जयपूर : जयपूर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पाच विकेट्सनी पराभव केला. या सामन्यात न्यूझीलंडच्या डावात दीपक चहर सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना स्टँडवर उभी असलेली दीपक चहरची बहीण मालती चहरने दीपकचे नाव घेत आरडाओरडा सुरू केला. मालतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दीपक चहरचा जयजयकार करणारा हा शेअर केला आहे.
दरम्यान, या व्हिडिओमध्ये दीपक मालतीला विचारत आहे की ती (जया भारद्वाज, दीपकची मंगेतर) कुठे आहे? यावर मालती उत्तर देते, ती तिकडे आहे. हाच व्हिडिओ शेअर करत तिने तिच्या इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मला नेहमीच दीपकला चिअर करायचे होते. आज माजे ते स्वप्न पूर्ण झाले आहे.
https://www.instagram.com/tv/CWYsSGJjoPS/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडिओमध्ये दीपक त्याची मंगेतर जया भारद्वाजबद्दल विचारताना दिसत आहे. त्याने मालतीला विचारले, ती कुठे आहे? उत्तरात मालती म्हणते की ती वर आहे. दीपकचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. अलीकडेच, IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील एका सामन्यानंतर, दीपकने जया भारद्वाजला स्टँडवर जाऊन सर्वांसमोर प्रपोज केले होते.
मालती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिच्या भावासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मालती तिचा भाऊ दीपकचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाते. IPL दरम्यान देखील मालती दिपक आणि चेन्नई सुपर किंग्जला सपोर्ट करताना दिसली.
महत्वाच्या बातम्या:
- ‘हे’ दुःखद, लज्जास्पद, पूर्णपणे अन्यायकारक; केंद्र सराकराच्या निर्णयावर कंगना नाराज
- ‘त्या गोष्टीवर काम करायला हवे’; गौतम गंभीरने सांगितली सूर्यकुमारची मोठी कमजोरी
- ‘देर आये दुरुस्त आये’, मोदींच्या ‘या’ निर्णयावर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया
- कपिल देव यांनी रोटेशन पॉलिसीवर उपस्थित केले प्रश्न; म्हणाले…
- ‘मोडेन पण वाकणार नाही’; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
