Share

‘मोडेन पण वाकणार नाही’; कृषी कायदे मागे घेतल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( Narendra Modi ) तीन कृषी कायदे ( farm laws ) मागे घेतले आहेत. सकाळी ९ वाजता मोदींनी देशाला संबोधीत करण्यासाठी भाषणाला सुरुवात केली. त्यात नुकतीच त्यांनी तीन कायदे मागे घेतल्याची घोषणा केली तसेच देशाची माफीही मागीतली आहे.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशहितासाठी संपूर्ण-  सत्यनिष्ठेने आणि शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी आम्ही हे कायदे आणले होते. शेतकऱ्यांच्या हिताचे हे कायदे होते. आम्ही काही शेतकऱ्यांना समजावण्यात कमी पडलो. अशी नाराजीही मोदींनी व्यक्त केली आहे.

कायद्याच्या ज्या तरतूदीवर त्यांचा आक्षेप होता. तो बदलायला आम्ही तयार होतो. आम्ही दोन वर्षासाठी कायदे सस्पेंड करण्याचाही निर्णय घेतला. मी देशाची क्षमा मागून पवित्र मनाने हे सांगतो की आमच्या तपस्येत काही कमी पडली असेल. आता आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे.

यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत लिहिले की, ‘बळीराजानी सिद्ध केलं ‘मोडेन पण वाकणार नाही’ ‘दिल्लीच्या तख्ता पुढे झुकणार नाही’,’ असे म्हणत शेतकऱ्यांच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!