मुंबई : येत्या ९ एप्रिलपासून आयपीएलचा १४वा हंगाम सुरु होत आहे. सलामीचा सामना हा मुंबई इंडियन्स आणि आरसीबी या संघात चेन्नई येथे होणार आहे. या सामन्यात मुंबईचा नियमीत सलामीवीर क्विंटन डिकॉक खेळणार नसल्याने सलामीला कोण खेळणार याबद्दल वेगवेगळे तर्कवीतर्क लावले जात आहे. मात्र सुत्राच्या माहितीनुसार डिकॉकच्या जागी सलामीला नवा खेळाडू दिसण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित-डिकॉक ही नियमीत सलामीची जोडी मैदानात उतरत असते. मात्र डिकॉक पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत व्यस्त असल्यामुळे सुरुवातीचे काही सामने उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघातील सलामीला रोहित सोबत दोन पर्याय संघ व्यवस्थापनासमोर आहेत. पहिला पर्याय आहे इशान किशनचा. इशान किशनने मुंबई इंडियन्सकडून अनेकदा चांगली खेळी करुन सामने जिंकुन दिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत एका सामन्यात इशान किशनने सलामीला येऊन चांगली कामगीरी केली होती. त्यामुळे पहिला पर्याय तोच असेल.
तर दुसरा पर्याय आहे तो ख्रिस लिनचा. ख्रिस लिनने या आगोदर केकेआर संघाकडून सलामीला खेळत धडाकेबाज फलंदाजी केली होती. गोलंदाजाची धुलाई करणारा फलंदाज म्हणून तो ओळखला जातो. मात्र याबरोबर तो फिरकी गोलंदाजीही करु शकतो. तेव्हा गरज जाणवली तर रोहित त्याच्या कडुन काही षटके गोलंदाजीही करुन घेऊ शकतो. तर आरसीबी संघातही सलामीला यावेळी देवदत्त पडीक्कल सोबत विराट कोहली सलामिला येणार आहे. तेव्हा सलामिच्या सामन्यात कोणती सलामी जोडी यशस्वी होते हे ९ एप्रिलला समजेल.
महत्वाच्या बातम्या
- ‘अशक्य ते शक्य’ करणारे रजनीकांत हे चित्रपट व जनमनातलेही महानायक – अजित पवार
- उदयनराजेंना दणका, महाविकास आघाडी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
- ‘गोकुळ’ मध्ये वारं फिरलंय ? प्रकाश आवाडेंनी केली तिसऱ्या आघाडीची घोषणा
- पुण्यात कोरोनाचा उद्रेक ! उद्या कडक निर्बंध लागणार ?
- ‘…जर कोहलीला विश्रांती हवी होती तर त्याने सांगायला हवे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

