🕒 1 min read
औरंगाबाद : महाराष्ट्रात महिला-मुली सुरक्षित नाही. गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यांसारख्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बलात्कार, हत्याकांड, प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी काढून आरोपींना फाशी द्या. महिला अत्याचार व दलित अत्याचार ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात महिला अत्याचाराचा उच्चांक वाढला आहे. राज्यभर महिलांवर बलात्कार अल्पवयीन मुलींचे हत्याकांड सुरू आहेत. देशभर महिलांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. बलात्कार हत्याकांडाचे सर्व प्रलंबित प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टातून निकाली काढून आरोपींना फाशी झालीच पाहिजे. तसेच बेटी बचाव धोरण बनवून राज्यभर महिला अत्याचारा विरोधात विशेष पोलीस स्टेशनची स्थापना झालीच पाहिजे. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
वाढते बलात्कार, महिला अत्याचार हत्याकांडाच्या घटना पाहता तात्काळ महिला आयोगाला सक्षम, कायद्याचा, न्यायालयीन अभ्यास असलेली सक्षम अध्यक्ष नेमण्यात यावी, कायदा व सुव्यवस्थेचा मोठा भयानक प्रश्न उभा राहिला असून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ सर्वपक्षीय, मंत्रिमंडळ, गृहखात्याची बैठक बोलवावी व ठोस पावले उचलावीत. अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने राहुल मकासरे, प्रथम कांबळे, बाबा तिवारी आदींच्या वतीने करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काही दिवसांत अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील’
- सोमय्यांनी गंभीर आरोप केलेला, भावना गवळींचा निकटवर्तीय असलेला सईद खान आहे तरी कोण?
- ‘माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती’, परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भारावले
- तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
- मुसळधार पावसाचा राज्यात धुमाकूळ; यवतमाळमध्ये एसटी बस वाहून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
