मुंबई : देशासह जगभरात गेले ५ महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने थैमान घातले आहे. लाखो लोकांचा आता पर्यंत मृत्यू झाला असून कोट्यवधी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. देशातील नव्या कोरोना बाधितांचा नवनवीन उच्चांक पहायला मिळत असतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी अजब दावा केला आहे.
‘जो जन्माला आला आहे, त्याला मृत्यू येणारच आहे हे गौतम बुद्धांनी सांगून ठेवलंय. सध्या होणारे मृत्यू हे करोनामुळे नव्हे तर निसर्गाच्या नियमानुसार होत आहेत. १० कोटींच्या लोकसंख्येत दोनशे-अडीचशे लोकांचा मृत्यू होतो यात नवीन काय?,’ असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. बीबीसीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये आंबेडकरांच्या या विधानाने खळबळ निर्माण झाली आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मुलाला कोरोनाची लागण!
यासोबतच त्यांनी मंदिर प्रवेश आंदोलनावरून सरकारवरच निशाणा साधला आहे. ‘ सरकारला करोनाबद्दल काडीचीही माहिती नाही. तसं असतं तर आम्हाला एकही आंदोलन करावं लागलं नसतं. त्यांनीच स्वत:हून मंदिरं, बाजारपेठा खुल्या केल्या असत्या. पण प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागतं आहे. सरकारला राज्य चालवण्यासाठी निवडून दिल असून, आमचं आयुष्य नियंत्रित करण्याचा अधिकार त्यांना दिलेला नाही.’ असे देखील ते म्हणाले.
राज्यात काल एका दिवसात १५ हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित! तर कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या…
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या मंदिर प्रवेश आंदोलनावर टीका केली होती. या टीकेला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिले असून ‘मी कुठे जायचं आणि कुठे नाही हे सांगायचा सरकारला अधिकार नाही’ असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
‘हा’ माजी क्रिकेटपटू दरीत कोसळला, शोधकार्य सुरु!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

