Share

पवारांच्या निकटवर्तीय नेत्याचे निधन, अजितदादांना शोक अनावर

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर – सोलापूरचे माजी आमदार युन्नूसभाई शेख यांचे प्रदीर्घ आजाराने आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान निधन झाले.ते ऐंशी वर्षांचे होते. कालच त्यांना सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात चार मुले तीन मुली असा परिवार आहे.

महापालिकेच्या राजकारणात त्यांचा दांडगा अनुभव होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध होता. स्थायी समितीच्या सभापती पदावर त्यांनी उत्कृष्टरित्या काम बजावले होते. १९६९, १९७५ आणि १९८५ साली तीन वेळा ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवक होते.

१९७५ मध्ये शरद पवार सोलापूरचे पालकमंत्री असताना युनूस भाई शेख यांना त्यांनी निवडून आणून महापौर केले. १९९० झाली ते विधान परिषदेवर निवडून गेले. मात्र १९९८ साली सुभाष देशमुख यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक, आणि धार्मिक स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. माजी आमदार युनूसभाई शेख साहेबांचे सोलापूरच्या विकासात मोठे योगदान आहे. सोलापूरकर त्यांचे योगदान कायम स्मरणात ठेवतील असा विश्वास व्यक्त करत, अजित पवार यांनी युनूसभाईंना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, माजी आमदार युनूसभाईंनी स्थानिक स्वराज्य संस्थेतून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक, स्थायी समिती सभापती, महापौर अशी महत्वाची पदे त्यांनी भूषवली. या कार्यकाळात त्यांनी सोलापूरच्या विकासाला गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

त्यांच्या कामाची आणि निष्ठेची दखल घेत आदरणीय शरद पवार साहेबांनी युनूसभाईंना विधान परिषदेवर काम करण्याची संधी दिली. या संधीचे त्यांनी सोने केले. सामान्य सोलापूरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कायम आग्रही राहिले. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या विविध प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारा नेता हरपला आहे.

#व्यक्तिविशेष : चे गव्हेरा- जगभरातल्या क्रांतिकारकांचा आणि युवकांचा आदर्श

कोकण दौऱ्यामुळे फडणवीसांच्या ज्ञानात तरी भर पडेल – शरद पवार

कॉंग्रेसच्या बड्या नेत्याची ‘ठाकरे सरकार’वर घणाघाती टीका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!