Share

‘प्रिय EC, माजरा क्या है ?’ भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम सापडल्यानंतर प्रियांका गांधींचा सवाल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

दरम्यान आसाम आणि प. बंगाल मध्ये दोन टप्प्यातील निवडणुका झाल्या आहेत यामध्ये काही गैरप्रकार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असं मध्ये एक व्हिडीओ समोर आला. ज्यात एका गाडीमध्ये ईव्हीएम मशीन आढळून आले. महत्त्वाचे म्हणजे ज्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडले ती गाडी भाजपा उमेदवाराची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विरोधकांनी भाजपावर टीका करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी केली आहे.

यावरून कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विट करत भाजप वर टीकास्त्र सोडले आहे. यावेळी त्यांनी ट्वीटमध्ये त्यांनी, ‘काय स्क्रिप्ट आहे ? निवडणूक आयोगाची गाडी खराब होते, तेथे तेव्हाच तेथे एक गाडी आली ती भाजप कार्यकर्त्याची निघाली निरागस निवडणूक आयोग यामध्ये बसून प्रवास करत होते.’ त्याचबरोबर, ‘प्रिय EC प्रकरण काय आहे. आपण देशाला यावर स्पष्टीकरण देऊ शकतात का ? असा सवाल त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!