Share

‘डेडमॅन’ अंडरटेकरने तीस वर्षांच्या समृद्ध कारकिर्दीनंतर ठोकला WWE ला रामराम

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली – ९०च्या दशकातील मुलांना ‘अंडरटेकर’ हे नाव परिचयाचे नाही असं होणारच नाही. ‘डेडमॅन’ या नावाने प्रसिध्द असलेला आणि सुमारे तीस वर्षे रेसलिंग रिंगमध्ये आपली दहशत गाजवणारा WWE सुपरस्टार अंडरटेकर याने कायमस्वरुपी स्वीकारली. अंडरटेकरसाठी जगभरातून सोशल मिडीयावर अनेक पोस्ट पडत आहेत.

काळे कपडे, फिकट राखाडी चेहरा, भीतीदायक डोळे आणि त्रास सहन करण्याची असामान्य क्षमता हे अंडरटेकरचे वैशिष्ठे होती. अंडरटेकरने स्वत: ट्विट करून चाहत्यांना ही बातमी दिली. अंडरटेकर आता ५५ वर्षांचा असल्याने वाढते वय लक्षात घेत त्याने हा निर्णय घेतला. ‘द लास्ट राईड’च्या अखेरच्या भागात अंडरटेकरने आपण निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं.

निवृत्ती घेताना काय म्हणाला अंडरटेकर?

आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम शेवट हाच आहे. डब्ल्युडब्लुई अध्यक्ष वीन्स यांनी मी परत येतो का हे विचारुन पाहिलं, पण आता ते शक्य नाही. आता माझी पुन्हा रिंगमध्ये येण्याची इच्छा नाही. आता मला थांबावं लागेल. माझ्यासाठी जिंकण्यासारखं आता काहीही राहिलं नाही. मी सर्वकाही मिळवलं आहे.

आता खेळ बदलला आहे. अशावेळी नवीन खेळाडूंना संधी द्यायला हवी. हीच वेळ मला योग्य वाटते. ‘द लास्ट राईड’ सिरिजने मला हे लक्षात आलं आहे, अशी भावूक प्रतिक्रिया अंडरटेकरने आपल्या निवृत्तीवेळी दिली आहे.

माझी सध्या मुंबईत यायची हिंमत नाही – नितीन गडकरी

शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली, अदिती तटकरेंवर गंभीर आरोप

देशमुखांच्या ‘या’ कट्टर समर्थकाच्या गळ्यात पडणार विधानपरिषदेच्या उमेदवारीची माळ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!