रायगड : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन,म्हसळा, आणि तळा या तीन तालुक्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चक्रीवादळामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यावरून आता शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. पालकमंत्री अदिती तटकरे या शासनाकडून आलेली मदत सर्व नागरिकांना पोहचवत नसून फक्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देत असल्याचा आरोप शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी म्हसळा येथे पत्रकार परिषद केला आहे.
पती सीमेवर करत आहे देशसेवा, पत्नी झाली तहसीलदार
शनिवारी म्हसळा येथील सार्वजनिक वाचनालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आत्यावश्यक वस्तूंचे दोन हजार किट मुंबई जिल्हाधिकारी यांच्याकडून म्हसळा तालुक्यासाठी आले होते. मात्र हे किट तालुक्यातील सर्व गरजूंना मिळणे अपेक्षित असतानाच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी प्रशासनावर दबाव टाकून या सर्व किटचेवटप फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना दिले असल्याचा आरोप नवगणे यांनी केला आहे.यावेळी त्यांचा सोबत तालुका प्रमुख महादेव पाटील,माजी तालुका प्रमुख नंदू शिर्के,शहर प्रमुख अनिकेत पानसारे,युवा सेना तालुका अधिकारी अमित महामुनकर,महिला प्रमुख रीमा महामुनकर,दिशा पाटील,दीपा कांबळे यांच्या सहित तालुक्यातील शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन रायगड जिल्ह्याचा पालकत्व स्विकारल्यानंतर देखील संकटाच्या काळात फक्त राष्ट्रावादी पक्षातील नेत्यांची काळजी घेऊन नुकसानग्रस्त जनतेला वार्यावर सोडणार्या निष्क्रिय पालकमंत्री अदिती तटकरे यांना बदलून दूसरा कार्यातत्पर पालकमंत्री द्यावा अशी मागणी करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांनी पत्रकार परिषदेत संगितले.
कंकणाकृती ग्रहण काळात देवीमुर्ती शुभ्र वस्ञासह सोवळ्यात
दरम्यान, विधान परिषद जागा वाटप आणि राज्य कारभारात विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करत उघड उघड नाराजी व्यक्त करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट मातोश्रीवर भेट घेतली. गेल्या आठवडाभरापासून दोन्ही नेते मुख्यमंत्र्यांची भेट मागत होते. मात्र मुख्यमंत्र्यांची वेळ मिळायला त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्यांना चक्क आठवडा उलटून गेला आहे. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. या बैठकीत जरी कॉंग्रेस नेत्यांची नाराजी शमली असेल परंतु स्थानिक स्थरावर आता कॉंग्रेस नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये सर्वकाही ठीक नसल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

