मुंबई : राज्याचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर ५०.९९ टक्के एवढा झाला आहे. राज्यात मंगळवारी ( १६ जून ) १८०२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ५७ हजार ८५१ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी ( १६ जून ) कोरोनाच्या २७०१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ५० हजार ४४ रुग्णांवर (ॲक्टिव) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
जगभरात कोरोनाबाधित आणि कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आकडेवारीनुसार महाराष्ट्र जर स्वतंत्र देश असता, तर कोरोनाबाधितांच्या संख्येत जगात १६व्या स्थानी असता. आणि महाराष्ट्रात देखील सर्वात जास्त रुग्ण मुंबईत आहेत. त्यामुळे देशभरात सर्वाधिक कोरोनाबाधित आणि रूग्ण असणाऱ्या मुंबईत सध्या कोरोनाचं थैमान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘माझी सध्या मुंबईत यायची हिंमत नाही’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. एका ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेला पदाचा मोह नाही, वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी आमची साथ सोडली – सुधीर मुनगंटीवार
‘सध्याच्या परिस्थितीत मुंबईत यायची माझी हिंमत नाही. मुंबईतली सध्याची परिस्थिती कठीण आहे. पण मला वाटतंय की ही स्थिती नक्कीच बदलेल’. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सलग अडीच ते ३ हजार रुग्ण रोज सापडत आहेत. त्यातच मिशन बिगीन अगेनदरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मुंबईची लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका अधिक वाढला आहे. अस नितीन गडकरी म्हणाले आहेत.
मंत्री घरात, जनता रस्त्यावर ; भाजप नेत्याची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका


