Share

देशमुखांच्या ‘या’ कट्टर समर्थकाच्या गळ्यात पडणार विधानपरिषदेच्या उमेदवारीची माळ

Published On: 

🕒 1 min read

लातूर – महाराष्ट्रात सध्या राज्यपालनियुक्त विधानपरिषद जागांची चर्चा आहे. बारा जागांसाठी महाविकास आघाडीतील सत्ताधारी शिवसेना- राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षात अद्याप कुणी किती जागा घ्यायच्या यावर अजून एकमत झालेले नाही. मात्र या जागांवर वर्णी लावण्यासाठी अनेकांकडून फिल्डिंग लावली जात आहे.

उदगीरमधून कॉंग्रेसचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. उदगीर नगरपालिकेवर सात टर्म अध्यक्ष राहिलेले निटुरे हे देशमुख समर्थक म्हणून सर्वत्र ओळखले जातात. उदगीर पंचायत समिती, जिल्हा परिषद व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला किंमत आहे. निटुरे हे लिंगायत समाजातील असल्याने व सध्या काँग्रेसमध्ये या समाजाला प्रतिनिधित्व नसल्यामुळे निटुरे यांना संधी दिली जाऊ शकते असे बोलले जाते..

दरम्यान, लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून चर्चा झाली. पण, उमेदवारी काही मिळाली नाही. आता सुरेखा पुणेकर विधानपरिषदेला तरी उमेदवारी मिळेल, अशी आशा बाळगून आहेत. ‘महाराष्ट्र देशा’ बरोबर बोलताना आयुष्यभर लोककला जपणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी सर्वच पक्षांना आपणास उमेदवारी द्यावी अशी विनंती केली आहे. जर पक्षांनी उमेदवारी दिली नाही तर कमीत कमी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी तरी माझ्या नावाचा विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

या संदर्भात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याची पुणेकर यांचा संपर्क होऊ शकला नाही. गरज पडली तर पवारांची भेट देखील घेऊ असं त्या म्हणाल्या. याशिवाय शिवसेनेकडून देखील उमेदवारी मिळेल अशी आशा पुणेकर यांना आहे.

विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

शेतकरी कर्जमाफीवरून भाजपचे आजपासून राज्यव्यापी आंदोलन

सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोला; मनमोहन सिंग यांचा मोदींना सल्ला

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!