मुंबई : २०१८ मध्ये दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर ऑस्ट्रेलिया संघातील दोन खेळाडूंना एका वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागले. मात्र हे प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेत आले आहे. आता या प्रकरणातील दोषी डेव्हिड वॉर्नरचा मॅनेजर जेम्स एर्स्किन याने एक नवा खुलासा केला आहे.
या प्रकरणातील दोषी डेव्हिड वॉर्नरचे मॅनेजर जेम्स म्हणाले की,’या प्रकरणाची चौकशीदरम्यान जो अहवाल तयार करण्यात आला तो सर्व खेळाडूंच्या मुलाखतीशिवाय करण्यात आला होता. मला या प्रकरणातील संपुर्ण सत्य माहित आहे. मात्र यामुळे काहीच साध्य होणार नव्हते. त्यावेळी या सर्व प्रकाराची खिल्ली उडवण्यात आली होती.’ यावेळी स्मिथ आणि वॉर्नर यांना देण्यात आलेल्या शिक्षाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणाण्यनुसार त्याना मिळालेली शिक्षा ही अन्यायकारक होती.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१८ साली झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान बॉल टेम्परिंगच्या प्रकरणात कॅमेरून बॅनक्रॉफ्टने बॉल टेम्परिंगची माहिती ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आधीच होती, असे सांगितले. या घटनेनंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांसाठी बंदी घातली होती, तर तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर १२ महिन्यांसाठी बंदी घातली होती.
महत्वाच्या बातम्या
- दिलासादायक : करोना विषाणू 99.99 टक्के नष्ट करणारी थेरेपी विकसीत करण्यात वैज्ञानिकांना आले यश
- १९ मे रोजी प्रदर्शित होणार ‘फॅमिली मॅन २’चा ट्रेलर; अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची घोषणा
- ‘राजकीय स्वार्थासाठी देशाची बदनामी करण्याचा काँग्रेसचा डाव उघड झाला’
- ‘कोरोनाचा हाहाकार ; केंद्र व राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?’
- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा स्तुत्य उपक्रम, दररोज भागवताय शेकडोंची भूक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

