मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 14 मध्ये सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरला मैदानात उतरवले नाही. डेव्हिड वॉर्नरला दोन दिवसांत हा दुसरा मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी शनिवारी संघाचं कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेण्यात आले.
सनरायझर्स हैदराबाद क्रिकेटचे दिग्दर्शक टॉम मूडी म्हणाले की, प्लेग इलेव्हनमधून बाहेर पडल्याने डेव्हिड वॉर्नर ‘हैराण आणि निराश झाला आहे.’ परंतु या कठोर निर्णयाच्या समर्थनात ते म्हणाले की, कोणालातरी बाहेर काढायचे होते त्यामुळे डेव्हिड वॉर्नरला वगळण्यात आले आहे.
वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्सने चालू हंगामातील सहापैकी पाच सामने गमावले आहेत आणि ते चांगल्या फॉर्ममध्येही नाहीत ज्यानंतर या संघाची जबाबदारी केन विल्यमसन यांच्यावर सोपविण्यात आली आहे. वॉर्नरच्या आयपीएल कारकीर्दीतील ही पहिलीच वेळ आहे जेव्हा एखाद्या फ्रँचायझीने खराब फॉर्ममुळे त्याला संघाबाहेर फेकले.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मूडीने स्टार स्पोर्ट्सला सांगितले,’आम्हाला कठोर निर्णय घ्यावा लागला, कुणाला तरी संघातून बाहेर जावे लागले आणि दुर्दैवाने ते होते. तो आश्चर्यचकित झाला आहे आणि निराश झाला आहे, कोणीही निराश होणार. मूडी म्हणाले, “फ्रँचायझीच्या दृष्टीकोनातून आपल्याला जे साध्य करायचे आहे, असा युक्तिवाद त्यांनी स्वीकारला पाहिजे. मला असं वाटत नाही की पूर्वी काय घडले ते जास्त महत्त्वाचे आहे आणि आम्ही गेल्या 24 ते 48 तासांत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या
- ‘लोकांनी भाजपच्या गद्दारीला चपराक दिली’, बंगाल निकालावर गुलाबराव पाटलांची टीका
- ‘मोदी-शाह हे मोठे नेते, पण अजिंक्य नाहीत’, भाजपच्या पराभवावर राऊतांचा टोला
- ‘संपूर्ण ताकद पणाला लावली पण पदरी निराशाच आली’, खडसेंचा भाजपला टोला
- रेमडेसिवीर प्रकरण; खा.सुजय विखेंच्या अडचणीत वाढ, ‘या’ अधिकाऱ्याकडे दिला तपास
- ‘..तर अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, उत्तर कोरियाचा इशारा


