Share

कृषी कायद्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार, औरंगाबादेत चक्का जाम

Published On: 

औरंगाबाद : केंद्रशासनाने आणलेले शेतकरी विरोधी कायदे त्वरित रद्द करावे या मागणीसाठी शनिवारी (दि.५) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने टी पॉइंट, जळगाव हायवे रोड, पैठण रोड, जालना बदनापूर रोडरोड याठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येत आहे.

केंद्रशासनाने तीन कायदे आणले आहेत ते रद्द करावे, शेतकऱ्यांकरीता एमएसपी कानूनचा नवीन कायदा करून सरकारने एमएसपीची हमी द्यावी. याशिवाय शेतातील लाईनबील पहिल्या पद्धतीनेच ठेवावी. नवीन लाईनबिल आणून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडू नये. फार्मिंग ऍक्ट मध्ये शेतकऱ्यांचा जो अधिकार आहे तो त्यांना द्यावा. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारचे माल दिले तरच कंपनी घेणार.

जर माल खराब झाला तर त्याला जबाबदार कोण? त्या शेतकऱ्यांचे काय? असे प्रश्न यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांना कोर्टात जाता येणार नाही? तर मग शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे? असा प्रश्न देखील उपस्थित करत शेतकरी विरोधी आणि अन्यायकारक कायदे रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गजानन बंगाळे आणि इतर शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!