🕒 1 min read
Shivsena | मुंबई : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं होतं. तसेच दोन्ही गटांना वेगळी नावं देण्यात आली होती. मात्र, आता शिवसेना (Shivsena) नेमकी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची की एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची या प्रश्नावर अखेर सुनावणी होणार आहे. याची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.
येत्या 12 डिसेंबर रोजी ही सुनावणी होईल, अशी माहिती समोर आली आहे. ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांचे वकील निवडणूक आयोगासमोर या दिवशी युक्तिवाद करतील.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी शिवसेना पक्षावर दावा सांगितला आहे. या दाव्यासाठी पुरावे म्हणून सर्व कागदपत्रे सादर करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती. २३ नोव्हेंबरला ही मुदत संपली. दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे महत्त्वाचे पुरावे सादरही करण्यात आले आहेत.
दरम्यान, हे प्रकरण सर्व प्रथम कोर्टात गेलं होतं. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, अंधेरी पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadanvis | “पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ”, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
- Krushna Hegade | “…म्हणून मी शिंदे गटात प्रवेश केला”, कृष्णा हेगडे यांचं स्पष्टीकरण
- Protein deficiency | शरीरात प्रोटीनची कमतरता असेल, तर करा ‘या’ फळांचे सेवन
- Breakfast Habit | नियमित नाष्टा केला नाही, तर होऊ शकतात ‘हे’ आजार
- Chhagan Bhujbal | “संजय राऊत यांच्यावर हल्ला होऊ शकतो”, छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
