Share

Protein deficiency | शरीरात प्रोटीनची कमतरता असेल, तर करा ‘या’ फळांचे सेवन

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी शरीरात मुबलक प्रमाणात प्रोटीन (Protein) असणे खूप आवश्यक असते. प्रोटीन हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर मासं, अंडी, डाळी, ड्रायफ्रूट इत्यादी गोष्टी येतात. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात पोषक घटक उपलब्ध असतात. मुलांच्या वाढीसाठी आणि शारीरिक विकासासाठी प्रोटीन हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे आपण नेहमी प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करत असतो. पण तुम्हाला माहित आहे का? काही फळांच्या सेवनाने तुम्ही शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढू शकतात. त्याच फळांबद्दल आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.

केळी

शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात केळीचे समावेश केला पाहिजे. कारण केळीमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम उपलब्ध असते. त्यामुळे केळीचे नियमित सेवनाने तुम्ही शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढू शकतात. त्याचबरोबर यामध्ये फायबर, मॅग्नेशियम विटामिन ए, विटामिन बी6, आणि विटामिन सी उपलब्ध असते. त्यामुळे केळीच्या सेवनाने शरीराला प्रोटीनसह अनेक फायदे देखील मिळू शकतात.

किवी

एक कप किवी मधून तुम्हाला दोन ग्रॅम पर्यंत प्रोटीन मिळू शकते. त्याचबरोबर किवीमध्ये विटामिन सी, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे इतर पोषक घटक देखील उपलब्ध असतात. त्यामुळे नियमित किवीचे सेवन केल्याने तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर कीवी शरीरात आयरनची कमी पूर्ण करण्यास देखील मदत करू शकतो.

पेरू

एक कप पेरूमध्ये 4.2 ग्राम पर्यंत प्रोटीन असते. पेरू या उष्णकटिबंधीय फळांमध्ये विटामिन सी आणि फायबर चांगल्या प्रमाणात आढळून येते. त्यामुळे नियमित पेरूचे सेवन केल्याने तुमच्या शरीरात प्रोटीनची कमी भासणार नाही.

चेरी

एक कप चेरीमध्ये 1.6 ग्रॅम प्रोटीन आढळून येते. त्याचबरोबर चेरीमध्ये उपलब्ध असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते. चेरीमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-अँक्सीडेंट आणि अँटी-इम्प्लिमेंटरी गुणधर्म आढळतात. त्यामुळे चेरीचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!