मुंबई : आर्यन खानच्या जामीनावर आज बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. यामध्ये आर्यन खानला कोणताही दिला मिळालेला नाही. या प्रकरणात उद्या गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडणार आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्त्वपूर्ण सुनावणी मंगळवारपासून मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली होती. पण, ती सुनावणी अपूर्ण राहिल्याने आर्यन खान आणि इतर दोघांच्या जामीन अर्जांवर आता उर्वरित सुनावणी आज बुधवारी सुरु होती. आर्यनतर्फे युक्तिवाद कालच पूर्ण झाला होता. आता अरबाझ मर्चंट आणि मुनमून धमेचातर्फे युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी आज सुनावणी ठेवली. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांच्यासह श्रीराम शिरसाट आणि विशेष सरकारी वकील अद्वैत सेठना हे हजर होते.
Drugs-on-cruise case: Accused Munmun Dhamecha's lawyer Kashif Khan Deshmukh, arguing for her bail before Bombay HC says, "I am a fashion model & do stage shows & ramp walks. I was invited by one person on the cruise for my professional obligations." pic.twitter.com/Md5OHHDS4W
— ANI (@ANI) October 27, 2021
मुकुल रोहतगी आणि अमित देसाई यांच्यावतीने आर्यन आणि अरबाजची बाजू मांडण्यात आली. दोघांवर केलेली कारवाई अनधिकृत असल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. आज युक्तिवादादरम्यान अरबाज मर्चंटचे वकील अमित देसाई यांनी रेव्ह पार्टीमध्ये सेवन करताना एनसीबी आरोपींना पकडते आणि नंतर त्यांची त्वरित रक्त तपासणी केली जाते. मात्र, या प्रकरणात एनसीबीने ते केलेले नाही असे हायकोर्टाला सांगितले आहे. अरबाज आणि मुनमुन यांच्या वकिलांचा युक्तिवाद संपला असून एनसीबीचा युक्तिवाद उद्या होणार आहे. त्यामुळे आर्यनच्या जामीन अर्जावर उद्या गुरुवारी दुपारी घेण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मौलाना अहमद यांनी आधी माहिती घ्यायला हवी होती; क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले
- नवाब मलिकांनी वानखेडेंचा ‘स्वीट कपल’ फोटो केला ट्वीट; दिला ‘हा’ इशारा
- राज्यपाल मलिक यांनी भाजपची ‘झाकली मूठ’च उघड केली; संजय राऊतांचा टोला
- लवकरच वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा सादर करणार; नवाब मलिकांचा इशारा
- भाजप सरकारच्या काळात गोव्याची अवस्था केविलवाणी झालीये; शिवसेनेचा टोला

