जालना : औरंगाबादमध्ये आज आयकर विभागाने काही व्यापाऱ्यांच्या संपत्तीवर धाडी टाकल्या आहेत. त्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले,’ धाडी, ईडी इन्कम टॅक्सचा वापर दबाव टाकण्यासाठी होतोय. भाजपला लोक बधत नाहीत. जनता शिवसेनेच्या मागे उभी आहे. त्यामुळे त्यांना काय करायचं ते करू देत. आमच्याकडे काहीही सापडणार नाही. असं ते म्हणाले. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार असल्याचा निर्धार आणि विश्वास शिवसेनेचे नेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. ते जालन्यात बोलत होते.
आमच्यावर दबाव निर्माण करण्यासाठीच आयकर विभागाचे संभाजीनगरमध्ये शिवसेनेशी संबंधितांवर छापे सत्र सुरु आहे. मात्र आम्ही याला घाबरणार नाही, असे म्हणत दानवे यांनी आयटीच्या धाडीवरुन सरकावर निशाणा साधला. तसेच, दसरा मेळाव्याबाबतही स्पष्टपणे भूमिका मांडली. मागच्या 56 वर्षांपासून शिवसेना शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेत आहे. यंदाही त्याच ठिकाणी दसरा मेळावा होणार असल्याचा विश्वास दानवेंनी व्यक्त केला, जालन्यात पत्रकारांशी ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या :
- Election Commission | आत्ताची मोठी बातमी! 18 जिल्हे, 1166 ग्रामपंचायत अन् निवडणुकीचा धुरळा उडाला…
- Navneet Rana | नवनीत राणा यांची पोलिसांसोबत हुज्जत
- BJP | पेंग्विनसेना मेळाव्याला परवानगी दिली पाहिजे, महाराष्ट्र हास्यजत्रेची वाट पाहतोय; भाजपचा सेनेला टोला
- Navneet Rana | पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी माझा कॉल रेकॉर्ड केला – नवनीत राणा
- Chandrasekhar Bawankule | “…अन् 5 कोटी मिळवा”; चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट ऑफरच दिली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

