Share

कन्नड घाटात कोसळली दरड, महामार्ग बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मध्यरात्रीपासून झालेल्या पावसामुळे मराठवाड्याला जोडणाऱ्या कन्नड (औट्रम) घाटात मोठ्या प्रमाणात दरडी कोळल्या आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या भागात जाणाऱ्या प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन महामार्ग पोलीसांनी केले आहे.

धुळे-सोलापूर महामार्गावरील कन्नड घाट मराठवाड्याला जोडणाऱ्या प्रमुख मार्गापैकी एक आहे. अगदी प्राचीन काळापासून या मार्गावरुन दळणवळ होत असल्याचे अनेक पुरावे आहेत. त्यात इंग्रजांच्या काळातील शिलालेख आजही आहेत. मात्र, अरुंद रस्ता असल्याने आणि वाहनांची संख्या जास्त असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होते. या मार्गावर बोगद्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. या बोगद्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली असली तरी तो अद्यापही कागदावरच आहे. आता हा मार्गच बंद झाल्याने ही मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे.

मध्यरात्री नंतर दरड कोसळल्याने अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात अद्याप कोणतीही जीवीत हानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. प्रशासनाच्या वतीने रस्ता पुन्हा खुला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तो पर्यंत पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!