Share

धोका वाढला, काळजी घ्या! औरंगाबादेत बुधवारी ४ जणांचा मृत्यू, ३२५ रुग्णांची वाढ

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले असून मंगळवारी (दि.२) एकाच दिवशी ३२५ रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतचा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा ५० हजार ९१६ वर जाऊन पोहोचला आहे. आज (दि.३) शहरातील शासकीय घाटी रुग्णालयात चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोना संसर्ग पुन्हा एकदा शहरात जोमाने पसरू लागला आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यावेळी घराघरात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे संपूर्ण शहरालाच कोरोनाने विळखा घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातील नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. घाटी रुग्णालयात कोरोनाचे आज चार मृत्यू झाले तर काल दोन मृत्यू झाले. असे एकूणच जिल्ह्यातील सहा रुग्णांचा दोन दिवसात घाटी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

आज मृत्यू झालेल्या मध्ये परभणीतील हदगाव येथील ३६ वर्षीय पुरुष, पुंडलिक नगर येथील ८८ वर्षीय पुरुष, एन-४ सिडको येथील ८० वर्षीय पुरुष, तर सिल्लोड औरंगाबाद मधील ७७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. शहरात काल १०२ तर ग्रामीण भागात २६ अशा एकूण १२८ जणांना सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत ४७२५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या एकूण २३८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!