मुंबई : राज्यपालांच्या अभिभाषणाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर सभागृहात दिले, त्यानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर जी चर्चा झाली, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री आपल्या तासभराच्या भाषणात सर्वत्र प्रवास करीत असताना महाराष्ट्रात मात्र ते येऊ शकले नाही. चीन, पाकिस्तान, अमेरिका, उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार, काश्मीर आणि अगदी दक्षिणेपर्यंत ते गेले. पण, महाराष्ट्राबाबत मात्र ते बोलू शकले नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
‘मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात भारतीय सैनिकांचा अपमान केला आहे. ‘चीन समोर आले की पळे’ असे म्हणून त्यांनी भारतीय सैनिकांचा मोठा अपमान केला आहे. उणे 30 डिग्री तापमानात शत्रूचा मुकाबला करून चीन सैनिकांना मागे धाडणारे आपले शूर सैनिक आहेत. त्यांचा घोर अपमान मुख्यमंत्र्यांनी केला आहे,’ अशी टीका फणवीसांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
‘पंजाब-हरियाणाचे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करण्यासाठी बसले आहेत. त्यांनी राजधानी दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून अडथळ्यांच्या भिंती उभ्या केल्या गेल्या. रस्त्यात खिळे ठोकले गेले, त्यांचा वीजपुरवठा बंद केला गेला, त्यांच्या सोयीसुविधा बंद केल्या. मात्र दुसरीकडं चीनने आपल्या भूमीवर कब्जा प्रयत्न केला. चीनसमोर हे पळाले. हे म्हणजे, शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसल्यावर पळे,’ असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- आरक्षणाचे आश्वासन देऊन भाजपाने धनगर समाजाला फसवले – नाना पटोले
- राहुल गांधींना उद्धव ठाकरेंनी खूप तगडं आव्हान दिलं आहे; भाजप नेत्याने उडवली खिल्ली
- ‘उद्धव ठाकरे औरंगाबादचं संभाजीनगर करूच शकत नाहीत, ते सत्तेच्या प्रेमात आहेत’
- विधानसभेत आज ‘कॉमेडी सम्राट’ पाहिला,’कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री’ : नितेश राणे
- डॅशिंग वसंत मोरे यांच्याकडे आता पुणे मनसेच्या शहराध्यक्षपदाची धुरा


