मुंबई : राममंदिर समर्पण निधीवर शिवसेनेकडून सातत्याने टीका केली जाते. पण, खंडणीखोरांना समर्पणनिधीतील भाव समजणार तरी कसा, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उपस्थित केला.
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर सभागृहात दिले, त्यानंतर विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर जी चर्चा झाली, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री आपल्या तासभराच्या भाषणात सर्वत्र प्रवास करीत असताना महाराष्ट्रात मात्र ते येऊ शकले नाही.
चीन, पाकिस्तान, अमेरिका, उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार, काश्मीर आणि अगदी दक्षिणेपर्यंत ते गेले. पण, महाराष्ट्राबाबत मात्र ते बोलू शकले नाही. मुख्यमंत्र्यांना आता भरपूर दिवस झाले. पूर्वी ते नवीन होते. पण, चौकातील भाषण आणि सभागृहातील भाषण या दोन्हींतील अंतर त्यांना अजूनही समजलेले नाही.
शेतकर्यांसंदर्भात एकही मुद्दा मांडू शकले नाही. बोंडअळी, विमा, वीजतोडणी कशावरही बोलले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो शेतकर्यांची वीज तोडणार्या मुख्यमंत्र्यांना सिंधू सीमेवरील शेतकर्यांची चिंता आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. हेडगेवार हे स्वत: एक स्वातंत्र्यसैनिक होते, हे कदाचित त्यांना ठावूक नसावे. भाजपाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरसाठी बलिदान दिले, असे सांगताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकारने दिलेले राज्यपालांचे भाषण जसे दिशा देणारे नव्हते, तसेच आजच्या मुख्यमंत्र्यांचे भाषण सुद्धा दिशाहिन होते. त्यांनी महाराष्ट्राची संपूर्णपणे निराशा केली. आम्ही गैरप्रकार दाखविला, भ्रष्टाचार काढला तर आम्हाला महाराष्ट्रद्रोही म्हणतात. आमच्यामुळे भ्रष्टाचार बाहेर आला तरच महाराष्ट्र वाचेल. आपल्या भाषणाची चीरफाड होऊ नये, म्हणून त्यांनी आम्हाला सभागृहात बोलू दिले नाही. असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- आरक्षणाचे आश्वासन देऊन भाजपाने धनगर समाजाला फसवले – नाना पटोले
- राहुल गांधींना उद्धव ठाकरेंनी खूप तगडं आव्हान दिलं आहे; भाजप नेत्याने उडवली खिल्ली
- ‘उद्धव ठाकरे औरंगाबादचं संभाजीनगर करूच शकत नाहीत, ते सत्तेच्या प्रेमात आहेत’
- विधानसभेत आज ‘कॉमेडी सम्राट’ पाहिला,’कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री’ : नितेश राणे
- डॅशिंग वसंत मोरे यांच्याकडे आता पुणे मनसेच्या शहराध्यक्षपदाची धुरा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

