🕒 1 min read
अहमदनगर : आधी कोरोनामुळे करण्यात आलेली ताळेबंदी आणि त्यानंतर जून महिन्यात पावसानं शेतकर्यांना दिलासा दिला खरा मात्र आता याच आतिवृष्टीने जोमत आलेल्या खरीप पिके अक्षरशः पावसात वाहून गेली आहेत. त्यामुळे खरीप पिकांच्या भारवशावर असलेला शेतकरी मात्र पुरता खचून गेल्याच चित्र दिसून येत आहे.
या अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने काढणी करून ठेवलेल्या सोयाबीन चे मोठे नुकसान झाले असून विदर्भात कापूस, पश्चिम महाराष्ट्रात ऊस व द्राक्षपीक, तर कोकणात भाताचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकससणीची त्तात्काळ भपई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
यावेळी खरीप हंगामात ३० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. याचे तातडीने पंचनामे करून एकरी किमान ५० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येऊन शेतकर्यांना तातडीने दिलासा देण्यात यावी, तसेच केंद्र सरकारने तत्काळ पथक पाठवून पाहणी करून आपत्ती सहायता निधीतून राज्य सरकारला पुरेशी मदत उपलब्ध करून द्यावी.
अशी मागणी मार्क्सवादी किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केली आहे. तसेच राज्य सरकारणे पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी त्याची कार्यवाही मात्र संथगतीने सुरू आहे.
शेतीतील साचलेले पाणी व वाहून गेलेले शेती यांची रास्त नोंद व्हावी, तर पंतप्रधान पीक विमा योजनेतील तरतुदींनुसार भरपाई मिळवण्यासाठी सरकाई यंत्रणांनी सतर्कता बाळगण्याची आवशकता असल्याच त्यान सांगितलं.
तर मोबाइल उपलब्ध नसल्यास कृषि विभाग, विमा कंपनीचे ऑफिस किंवा बँकेत आवश्यक कागदपत्रे जोडून भरपाई साथी दावा करावा असे आवाहन नवले यांनी केले आहे. त्यामुळे आता शेतकरी आणि संघटनांकडुन होत असलेल्या मागणीकडे सरकार लक्ष देत केव्हा नुयाकसन भरपाई मिळते याकड शेतकरी डोळे लावून बसले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- भूकंपावर मात केलीय, यातूनही सावरू; शरद पवारांनी वाढवले शेतकऱ्यांचे मनोबल
- सत्तेत नसताना ‘सरसकट’ मागणी, मग आता ‘पंचनामे’ कशाला ?
- उद्धव ठाकरे आजवरचे सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री !
- ६ महिन्याने मुख्यमंत्री घराबाहेर पडणार ही ब्रेकिंग न्यूज असेल तर महाराष्ट्रासाठी दुसरं दुर्दैव काय?
- राहुरी तालुक्यातील अनेक गावांत भगरीतून विषबाधा; रुग्णांच्या मदतीसाठी धावले मंत्री तनपुरे!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
