मुंबई : कोरोनाच्या संकटावर मात करून यंदाची दिवाळी राज्यभरात साजरी केली जात आहे. याच महिन्यात महाविकास आघाडी सरकारला देखील वर्षपूर्ती देखील होत आहे आणि याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
‘राज्यात कोरोना नसता तर अधिक उत्साहाने दिवाळी साजरी करण्यात आली असती. गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनेक संकटांशी सामना करून सरकारची वर्षपूर्ती केली आहे. हे सरकार अस्थिर कारण्याचे अनेक अघोरी प्रयोग विरोधकांनी केले असले तरी त्या सगळ्यांना पुरून उरून या सरकारने वर्षपूर्ती केली आहे.’ असा घणाघात त्यांनी भाजपवर केला आहे.
‘अनेक नैसर्गिक संकटे आपल्यावर आली. परंपरेने आज नरकासुराचा वध केला असून महाराष्ट्रासाठी आणि सरकारसाठी आजपासून मंगल आणि शुभदिवस चालू होत आहेत. यासोबतच, पुढे उरलेली चार वर्षे देखील फक्त महाराष्ट्राचा विकास, जनतेचं कल्याण आणि महाराष्ट्राने राष्ट्राला मजबूत करण्यासाठी प्रत्येक पाऊल उचललं जाईल असं अशा पद्धतीने या सरकारच काम असेल अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.’ असं देखील संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
- यंदाच्या दिवाळीत देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांसाठी एक दिवा लावा; पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
- …अन आईच्या आठवणीने शरद पवार गहिवरले !
- रिपब्लिक टीव्हीचा भाजपशी थेट संबंध असल्याने फडणविसांनी अन्वय नाईक प्रकरण दडपले !
- पंकजा मुंडेंकडे भाजपने सोपवली आणखी एक महत्वाची जबाबदारी
- व्यर्थ न जाओ बलिदान : अवघ्या वीसाव्या भारत मातेसाठी जीवन केले अर्पण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
