Share

खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या बिलाचे आता दररोज ऑडीट :विभागीय आयुक्तांच्या सूचना

Published On: 

औरंगाबाद : खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांची सर्रास लूट करत आहेत. ज्यांनी उभ्या आयुष्यात एक लाख रुपये प्रत्यक्ष पाहीले नाहीत,  अशा रुग्णांच्या हातात तीन – चार लाखांचे बिल ठेवले जात असल्याची तक्रार आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे. यावर यापुढे प्रत्येक खासगी रुग्णालयातील सर्व बिलांचा डाटा मागवा आणि त्याचे ऑडिट करा, अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यामध्ये गरज नसताना अवाजवी बिल आणि रेमडेसिविर इंजेक्शनची टंचाई या दोन मुद्द्यांवर लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले. या वेळी खासदार, आमदार,, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त,मनपा आयुक्त,जि. प. अध्यक्षा, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. एका खासगी रुग्णालयातील रुग्णांना सोमवारी रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नव्हते.  त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अधिष्ठातांकडून एक मागणीपत्र तयार करून घेतले, आणि अंदाजे २० नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन रेमडेसिविरची मागणी केली.

त्यावर जिल्हाधिकारी चव्हाण यांनी त्या मागणीपत्रावर स्वाक्षरी करून घाटीत पाठवले. त्यानंतर घाटीने एमजीएम रुग्णालयाला रेमडेसिविरच्या २५० व्हायल उसनवारी तत्त्वावर देऊ केल्या. ‘केवळ प्रशासनाची मदत घेतल्यानंतर तातडीने रेमडेसिविर उपलब्ध होत आहेत तर एमजीएम ही प्रक्रिया स्वतःहून का करत नाही,’ असा सवाल एका नातेवाइकाने केला.

मेल्ट्रॉन, सिव्हिलला ऑक्सिजन कधी?
जिल्हाधिकारी स्वतः रेमडेसिविरचे वाटप करणार होते त्याचे काय झाले? जालना जिल्ह्यात १० हजार व्हायल पडून आहेत. आपल्याकडे दोन, पाच हजारच आहेत. याशिवाय मेल्ट्रॉन, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची तातडीने व्यवस्था करावी. वर्ष झाले तरी या दोन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची पुरेशी व्यवस्था झालेली नाही. हे स्थानिक प्रशासनासह राज्य सरकारचे अपयश असल्याचे आमदार अतुल सावे यांनी सांगितले.

ऑडिटर्सचे नावासह मोबाइल क्रमांक लावा
वाढीव बिलासंदर्भात अनेकांचे फोन येत आहेत. यावर नियंत्रण ठेवले पाहिजे. महसूल विभागाने नेमलेले ऑडिटर्सचे नाव, मोबाइल क्रमांक सर्व हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावावेत. ऑडिटर्सनादेखील हॉस्पिटलमध्ये उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. ऑक्सिजनचेही ऑडिट व्हावे. कोणत्या हॉस्पिटलने किती आणि कोणत्या रुग्णांना ऑक्सिजन वापरला हे कळू द्या अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!