Share

पायातून रक्त वाहत असतानाही सीएसकेचा ‘हा’ खेळाडू मैदानावरून हटला नाही; फोटो व्हायरल 

Published On: 

अबुधाबी : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाला डॅडी आर्मी म्हटले जाते, कारण त्यांच्याकडे अनेक अनुभवी खेळाडू आहेत. तथापि, प्रत्येक CSK खेळाडूने प्रत्येक वेळी हे दाखवून दिले आहे की, खेळाडू जरी वयस्कर असले तरी तो संघासाठी आपले १०० टक्के देण्यास मागे हटत नाही. ताजे उदाहरण दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फाफ डु प्लेसिस यांने दिले आहे, जो जखमी झाल्यानंतरही मैदानावर खेळत राहिला.

आयपीएल 2021 च्या 38 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध क्षेत्ररक्षण करताना, सीएसके सलामीवीर फाफ डू प्लेसिसला सुरुवातीला गुडघ्याला दुखापत झाली, पण त्याने कोणालाही सांगितले नाही. मैदानावरही विशेष उपचार घेतले गेले नाहीत. नंतर, जेव्हा लोकांनी त्याच्या पँटवर रक्ताचे डाग पाहिले तेव्हा प्रत्येकाला कळले की फाफ प्लेसिसला दुखापत झाली आहे. एवढेच नाही, दुखापतीनंतरही फाफ डु प्लेसिसने मैदान सोडले नाही.

फाफने केकेआरविरुद्ध 20 षटके खेळली. याआधी शेन वॉटसननेही चेन्नई सुपर किंग्जसाठी आपला कट्टरपणा दाखवला आहे. 2019 च्या फायनलमध्ये तो गुडघ्याला दुखापत घेऊन खेळला. जेव्हा तो फलंदाजी करून मैदानावरून परतला, तेव्हा सर्व सहकारी खेळाडूंना कळले की त्याला गंभीर दुखापत झाली आहे आणि नंतर त्याला अनेक टाकेही लागले. मात्र, फाफ डु प्लेसिसची दुखापत इतकी गंभीर नाही. फाफचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!