औरंगाबाद : जिल्ह्यात यंदाही पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले खरिपाचे पीक हिरावून घेतले आहे. सलग तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचा हा हंगा-म नुकसानीचाच ठरत आहे. यावर्षी ६ लाख ६३ हजार ७४७ हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामची पेरणी झाली आहे. यात कापूस ३ लाख ६१ हजार, मका १ लाख ७२ हजार, सोयाबीन २८ हजार तर तुरीचे ४६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. जून, जुलैमधील कमी पावसातही पिक सुस्थितीत होते. परंतु, खरीप संकटात सापडले आहेत. दोन उलटूनही पीक नुकसानीचे पंचनामे झाले असून गंगापूर, सिल्लोड हे दोन तालुके अजूनही ५० टक्क्यांच्या आतच आहेत.
ऑगस्टच्या शेवटच्या दोन दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने व सप्टेंबरमधील अतिवृष्टीने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. या नुकसानीनंतर राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, परंतु दोन आठवडे उलटूनही केवळ ६५.२८ टक्केच पंचनामे पूर्ण झाले आहेत.
यात गंगापूर तालुक्यात सर्वांत कमी केवळ २८.५४ टक्के, वैजापूरमध्ये ५४.८० टक्केच पंचनामे पूर्ण झाले आहेत. तसेच महसूल राज्यमंत्र्यांच्या सिल्लोड युवक तालुक्यात केवळ ३४.९७ आणि यांनी कॅबिनेट मंत्र्यांच्या पैठण तालुक्यात ६९.७८ टक्केच पंचनामे पूर्ण करण्यात प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान पंचनाम्यांनाच उशीर होत असल्याने मदत मिळणार तरी केव्हा, असा सवाल बाधित शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा भांगडा पाहून स्वरा भास्कर म्हणाली…
- सोमय्या, तुमच्यात हिम्मत असेल तर ‘त्या’ बँकेतील भ्रष्टाचारही बाहेर काढा- राजू शेट्टी
- ‘पेट्रोल ऐवजी इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर केल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा लाभ होईल’
- आता बॅट्समन ऐवजी वापरला जाणार ‘हा’ शब्द; नियमात मोठा बदल
- ‘काँग्रेसमध्ये मला अशी वागणूक तर सामान्य कार्यकर्त्याचं काय होत असेल?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

