कोल्हापूर : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पन्हाळा तालुक्यातील असुरले गावातील ग्रामपंचायतचे उद्घाटन केले. याप्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला. त्यांनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर टीका केली आहे. आम्ही तुमच्यावर बारकाईने यांच्यावर लक्ष ठेवून आहोत. 40 आमदार पैशाचा पाऊस पाडत आहेत. कोल्हापुरात देखील गद्दार लोकं निघाली आहे. कोल्हापुरात देखील त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असं अजित पवार म्हणालेत.
महाविकास आघाडीचे सरकार असताना आम्ही सर्वांना निधी दिला मात्र भाजप शिंदे सरकारमध्ये केवळ त्यांच्या आमदारांना निधी देत असल्याचा आरोप ही अजित पवार यांनी यावेळी केला आहे. पुढे ते म्हणाले, हे मूठभर लोकांचं राज्य नाही. अशा गोष्टी कोण करत असाल तर कोणी ताम्रपट घेऊन जन्माला आले नाही. एकनाथ शिंदे देखील कायमचे खुर्चीवर बसणार नसून १४५ चा आकडा गेला की तेही सत्तेतून जातील. काय असे एकनाथ शिंदे यांच्या मनात होते की ते ४० आमदारांना घेवून गेले. मात्र सध्या सर्वत्र त्यांना पन्नास खोके एकदम ओक्के बोलले जात आहे, असा चिमटा पवारांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना काढला.
वेदांता प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर शिंदे दिल्लीला गेले आणि हात हलवत परत आले, असं म्हणत अजित दादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अजित पवार यांनी यावेळी दसरा मेळाव्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला. तुमच्या भाषणातून लोक निघून गेली मग स्वत:हून ती कशी आली? असा सवाल पवार यांनी केला आहे. तसेच शिंदेच्या भाषणातून लोक उठून गेल्याने शिंदेंना भाषण थांबवावे लागले अशी टीका पवार यांनी केली आहे.
बसेससाठी १० कोटी कोठून आणले याचे उत्तर शिंदे यांनी द्यावे. महाराष्ट्रला कुठल्या दिशेने नेणार हे सांगायला पाहिजे होते. परंतु शिंदे आम्ही गद्दार नाही हेच वारंवार सांगत होते. शिंदे महागाईवर का बोलले नाहीत? असा सवाल अजित पवार यांनी शिंदेंना केला आहे. भाजप सरकार बेरोजगारी वाढविणारे आहे. कारण राज्यातील २ लाखांचा प्रकल्प गुजरात गेला. मात्र यावर भाजप आणि शिंदे कधी बोलणार नाहीत असं म्हणत पवारांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला.
महत्वाच्या बातम्या :
- Mohan Bhagwat | ‘वर्ण आणि जातीव्यवस्थेचा त्याग केला पाहिजे’ म्हणत मोहन भागवत यांनी केलं मोठं वक्तव्य
- Nana Patole | नाशिकचा अपघात खड्ड्यांमुळेच ; नाना पटोले यांचा आरोप
- NANA PATOLE । “तुम्हाला जन्मदात्त्यांबद्दल अभिमान नाही, ही कुठली संस्कृती?”; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पटोलेंचा सवाल
- Whatapp Update | आता Whatapp मध्ये बघता येईल ट्रेन अपडेट
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात काळ्या पैश्यांचा पाऊस? हायकोर्टात मनी लाँड्रींगची याचिका दाखल; ईडी करणार का चौकशी?


