पुणे : सध्या सत्ताधारी आणि विरोधकात अनेक मुद्द्यांवरुन कलगीतुरा रंगला आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. त्यावर पुण्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांना थेट नवरत्न तेल डोक्याला लावण्यासाठी पाठवले आहे. संदीप काळे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे.
बोलताना जरा डोकं शांत ठेवून टीका करत जा, म्हणून हे नवरत्न तेल तुमचं डोकं शांत करण्यासाठी पाठवलं आहे. असा इशाराच जणू या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांना दिला आहे.
सांगलीत चंद्रकांत पाटलांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही. कारण ५४ आमदारांच्या वर त्याला आम्ही जाऊ दिले नाही. सगळं आयुष्य गेलं, कधी ६० वर तो गेला नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका केली होती.
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारमधील महत्त्वाच्या समितीवर खासदार इम्तियाज जलील यांची फेरनिवड!
- सिंघू बॉर्डरवर हत्या करणारा सरवजीत म्हणतो, “मला अजिबात पश्चाताप होत नाही”
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
