🕒 1 min read
मुंबई: राज्यात सध्या युसूफ लकडावाला प्रकरण चांगलेच गाजत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असून त्यांनी युसूफ लकडावालाकडून 80 लाखांचे कर्ज घेतले असल्याचा दावा केला. यानंतर भाजपकडून लकडावालासोबत मविआ नेत्यांचे फोटो पोस्ट करण्याचे सत्र सुरु झाले. मात्र आता शिवसेना नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadanvis) यांचा फोटो पोस्ट करत निशाणा साधला आहे.
“मुंबई हल्ल्याचा आरोपी दाऊदचा माणूस युसुफ लकडावाला. आणि या बाई कोण हे काही सांगायला हवे का? लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या बरे? आता यांना कोणता न्याय लावावा?”, असे ट्वीट मनीषा कायंदे यांनी केले आहे. यासोबतच अमृता फडणवीस आणि युसूफ लकडावाला यांचा एक फोटोही पोस्ट करण्यात आला आहे.
मुंबई हल्ल्याचा आरोपी दाऊदचा माणूस – युसुफ लकडावाला. आणि या बाई कोण हे काही सांगायला हवे का? लकडावालाकडून वहिनी काय घेत असाव्या बरे? आता यांना कोणता न्याय लावावा?@fadnavis_amruta @Dev_Fadnavis @MohitKambojBJP @BJP4Mumbai @BJP4Maharashtra @OfficeofUT #Dawood #BJP pic.twitter.com/ncuicT6wgt
— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) April 30, 2022
दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनीही एक फोटो ट्वीट केला होता. ज्यामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि युसूफ लकडावाला हाथमिळवणी करताना दिसून आले होते. सोबतच बलराम जाखरही यामध्ये दिसून येत होते.
संजय राऊत यांनी नेमके कोणते आरोप केले?
‘अंडरवर्ल्ड कनेक्शन’, लकडावाला यांना 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यांचा लॉकअपमध्येच मृत्यू झाला. युसूफच्या अवैध कमाईचा काही भाग अजूनही नवनीत राणा यांच्या खात्यात आहे. मग ईडी राणाला चहा कधी देणार? या डी-गँगला का वाचवले जात आहे? भाजप गप्प का? तसेच तुरुंगात मरण पावलेल्या युसूफ लकडावालाकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतले होते. त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. आणि डी गँगशीही त्याचे संबंध होते. ईडीने याची चौकशी केली का? असा सवाल करत संजय राऊत यांनी हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचे म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 LSG vs PBKS : …अन् पुन्हा कृणाल पंड्या-दीपक हुडाचं भांडण होता होता राहिलं! पाहा VIDEO!
- “उद्धव ठाकरेंची अवस्था ‘गजनी’ सारखी…”; संदीप देशपांडेंचं वक्तव्य
- “अख्खा शिवसेना पक्षच राष्ट्रवादीला भाड्याने…”, राम सातपुतेंचा संजय राऊतांना टोला
- “बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला ठेच पोहचत असेल..” ; केंद्रीय मंत्र्यांची शिवसेनेवर टीका
- VIDEO : इंग्लंडमध्ये चेतेश्वर पुजाराचा धुमाकूळ..! साजरी केली ‘हॅट्ट्रिक’; पाहा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
