नवी दिल्ली : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तो जुवेंटसला निरोप देत त्याच्या जुन्या क्लब मँचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाला आहे. मँचेस्टर युनायटेड क्लबमध्ये त्याचे पुनरागमन अनेक वर्षांनंतर झाले आहे. क्लबने शुक्रवारी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
रोनाल्डो इटालियन क्लब युव्हेंटससोबत तीन वर्षे घालवल्यानंतर इंग्लिश प्रीमियर लीगमधील क्लबमध्ये परतला आहे. दरम्यान कालपर्यंत रोनाल्डो मँचेस्टर सिटीमध्ये जाऊ शकतो अशी चर्चा सुरु होती.
रोनाल्डो जुवेंटसमधून बाहेर पडेल अशी अटकळ होती. त्याचे प्रशिक्षक मॅसिमिलियानो अलेग्री यांनी शुक्रवारीच ही माहिती दिली आणि सांगितले की क्लबसोबत राहण्याची त्याची कोणतीही योजना नाही. यानंतर असे म्हटले जात होते की रोनाल्डो मँचेस्टर सिटीला जाऊ शकतो. आता तो मँचेस्टर युनायटेडमध्ये सामील झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘राणे यांनी तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा शिवसेना त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर देईल’
- पुजाराच्या झुझांर खेळीमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियाचे जोरदार पुनरागमन, अद्यापही १३९ धावांनी पिछाडीवर
- ‘भुजबळ, धनंजय मुंडे हे ओबीसी आरक्षणाबाबत तोंडाला डिंक लावून गप्प बसतात’
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- मोठी बातमी : राज्यातील आणखी एका जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
