Share

पालकमंत्री शंकरराव गडाखांच्या दौऱ्यात गोंधळ; खा. निंबाळकर व शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी 

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद –राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. निसर्गाची अवकृपा तसेच सरकारची उदासीनता यामुळे शेतकऱ्यांना कुणी वाली आहे की नाही असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. यातूनच शेतकरी आणि नेतेमंडळी यांच्यात आता संघर्ष पाहायला मिळत आहे.

पालकमंत्री शंकरराव गडाख हे अतिवृष्टीग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात गोंधळ झाला असल्याचे वृत्त समोर आले आहे. कळंब तालुक्यातील बाहुला गावातील कोल्हापुरी बंधाऱ्यांची पाहणी करण्यासाठी ते आले होते. याच वेळी भाजप कार्यकर्ते त्या ठिकाणी आले त्यावेळी काहीसा गोंधळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

शंकरराव गडाख हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचे सांगण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि शेतकरी आले होते. यावेळी पालमंत्र्यांनी त्यांचे साधे म्हणणे देखील ऐकून घेतले नाही.  विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी आणलेले नुकसान झालेलं सोयाबीन देखील पालकमंत्र्यांनी न पाहिल्याने त्यांनी केला संताप व्यक्त

यावेळी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर आणि या  शेतकऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यामध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली. नुकसानीच्या मदतीचे सांगू नको सोयाबीनचे भाव किती कमी झाले ते पहा असे शिवसेनेच्या कार्यकर्यांनी त्यांना सुनावले. त्यानंतर ‘ए जास्त बोलू नको’ असे म्हणत खासदार ओमराजेंनी भाजपच्या कार्यकर्त्याला दम दिला असं देखील सांगण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!