Share

रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत

Published On: 

औरंगाबाद : पंधरा दिवसांपुर्वी लुटमार केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. ही कारवाई बुधवारी दुपारी करण्यात आली. विक्की उर्फ हेल्मेट गौतम सोनकांबळे (३०, रा. इच्छामणी हॉटेलजवळ, मुकुंदवाडी) असे गुन्हेगाराचे नाव आहे.

सातारा परिसरातील पेशवेनगर भागात असलेल्या प्रल्हाद महाराज मंदिराच्या शेजारी हेल्मेट व त्याच्या साथीदाराने पंधरा दिवसांपुर्वी एकाला लुटले होते. आज गुन्हे शाखा पोलिसांनी हेल्मेटला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने लुटमार केल्याची कबुली दिली. लुटमारीतून आलेली रक्कम नशा करण्यासाठी खर्च केल्याचे सांगत त्याने साथीदाराची माहिती देण्यास टाळाटाळ केली.

त्याला सध्या सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त रविंद्र साळोखे, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, जमादार किरण गावंडे, संजयसिंग राजपूत व बबन ईप्पर यांनी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!