अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अकोले विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार डॉ.किरण लहामटे यांच्या विरोधात खडकी बुद्रुक येथील एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार किरण लहामटे यांनी आपणास मारहाण केल्याची तक्रार खडकी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीचे शिपाई रामदास लखा बांडे यांनी राजूर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार आ.लहामटे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार रामदास बांडे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, काल दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मी खडकी बुद्रुक गावातून पायी चालत असताना आ.किरण लहामटे यांच्या गाडीने कट मारून पुढे जात असताना आपण ओरडून गाडी हळू चालवा असे म्हणालो असता या गोष्टीचा राग आ.लहामटे यांना आल्याने ते गाडीच्या खाली उतरले व मला ओळखतो का? असे म्हणून माझ्या छातीवर लाथ मारली व मला शिवीगाळ केली व त्यानंतर गाडीत बसून निघून गेले असे तक्रारीत म्हटले आहे.
अशी कुठलीही घटना घडली नसून विरोधक मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे असे आ.किरण लहामटे यांनी सांगितले. दरम्यान अकोले भारतीय जनता पार्टीच्या वतीने घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. एका सामान्य माणसाला तालुक्याचे लोकप्रतिनिधी अंगावर हात टाकत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे, असे मत अकोले भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे यांनी व्यक्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
- इंदुमिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यास माझा विरोध : प्रकाश आंबेडकरांचा गौप्य स्फोट
- ‘बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत’ ; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारला जाग येईल का? सामनातुन केंद्र सरकारला खडेबोल
- शरद पवार व निलेश लंके यांचा दिल्ली ते मुंबई सोबत प्रवास!
- ‘बाप मुख्यमंत्री, स्वतः कॅबिनेट मंत्री तरी लोक दुसऱ्या पक्षात चालले आहेत’ ; निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

