Share

शरद पवार व निलेश लंके यांचा दिल्ली ते मुंबई सोबत प्रवास!

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील के.के.रेंजच्या प्रश्नांवर तोडगा काढून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत दिल्ली ते मुंबई असा विमानप्रवास करण्याचा योग पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना काल आला. पवार यांच्यासोबत केलेल्या प्रवासातील अनुभव आ.लंके यांनी फेसबुक पोस्टद्वारे मांडले. तू माझ्यासोबत मुंबईला चल, असे साहेबांनी मला सांगितले. आणि त्यांच्यासोबत विमानाने पवार साहेब मला घेऊन आले, असे लंके यांनी म्हटले आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये आ.लंके यांनी म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षांपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत आहे. साहेबांना या अगोदर मी अनेकदा भेटलो, मात्र त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. मात्र हा योग जुळून आला तो शुक्रवार दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजी पारनेर, राहुरी आणि नगर या तालुक्यांमध्ये के के रेंज विस्तारीकरणाकरीता जमीन संपादित करण्यात येऊ नये याकरता आमचा लढा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. यासंदर्भात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात साहेबांनी फोन केला.

मात्र संरक्षण मंत्री कार्यालयात नसल्याने बोलणे झाले नाही. परंतु काही वेळातच साहेबांना राजनाथ सिंह यांचा फोन आला आणि भेटीची वेळ ठरली. हा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला मांडण्याची संधी साहेबांनी दिली. माझे सर्व मुद्दे कसे योग्य आहेत, हे पवार साहेबांनी संरक्षण मंत्री तसेच लष्कराच्या अधिकाऱ्यांना पटवून दिले. याबाबत संरक्षण विभागाने त्वरित सकारात्मक निर्णय घेतला. असे लंके म्हणाले.

त्यानंतर या ठिकाणाहून बाहेर आल्यानंतर तुम्ही कधी जाणार आहात असा प्रश्न पवार साहेबांनी मला विचारला. संध्याकाळी निघणार असल्याचे मी सांगितले. तू माझ्यासोबत मुंबईला चल असे साहेबांनी मला सांगितले. आणि त्यांच्यासोबत विमानाने पवार साहेब मला घेऊन आले. दीड तासाच्या प्रवासामध्ये साहेबांनी माझ्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. याशिवाय मराठा आरक्षणाबाबत सुद्धा पवार साहेबांनी एक आमदार म्हणून माझं मत विचारले. इतक्या मोठ्या उंचीच्या नेतृत्वाकडूनही माझ्यासारख्या नवीन आमदाराचे मत विचारात घेतले जाते. यावरून साहेबांच्या मोठ्या मनाची उंची दिसून आली.

काही दिवसांपूर्वी शरदचंद्रजी पवार साहेब यांचा लहानपणाचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्याबाबतही साहेब भरभरून बोलले. हास्यविनोद करून विमानातील वातावरण अल्हाददायक केले. मध्येच आपले प्लेन कुठे आले आहे. आपण किती उंचावर आहे, त्याचबरोबर तापमान किती आहे. याबाबत पवार साहेब मला माहिती देत होते. पवार साहेबांसोबत मला अशाप्रकारे विमान प्रवास करता येईल. हे मी स्वप्नातही पाहिले नव्हते, मात्र नियतीने, आणि माझ्या पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेमुळे हा योग आला असल्याचे आ.लंके यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!