Share

सोशल मिडियावर पोलिसांची बदनामी करणाऱ्या तरुणा विरोधात गुन्हा

Published On: 

🕒 1 min read

नांदेड: सध्या तरुणांमध्ये समाज माध्यमाबाबत मोठी क्रेझ आहे. त्यामुळे दिवस रात्र समाज माध्यमावर असंख्य तरुणाई आपल्या भावना व्यक्त करीत असतात. या भावना व्यक्त करण्याच्या नादात आपण काय बोलतो आहे याचा भानसुद्धा काही वेळा त्यांना नसतो. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशीच एक घटना नांदेड जिल्ह्यात घडली.

सध्या कोरोना महामारी व संचारबंदी लागू असल्याने सोशल मिडियातील व्हॉटसॲप,फेसबुक, टिव्टरसह अन्य साधनांवर नांदेड जिल्हा पोलीस दलातील सोशल मिडिया देखरेख पथकाचे बारीक लक्ष आहे. या पथकाकडून फेसबुक हाताळताना नांदेड पोलीस दलाची बदनामी करणारा आक्षेपार्ह व बदनामीकारक व्हिडीओ फेसबुकवर प्रसारित केल्याचे आढळून आले. ही बाब २५ मार्च रोजी उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांच्या सोशल मिडिया टीमने सदर व्हिडीओ प्रसारित करणारा रुपेश रामजी आठवले याचा शोध घेतला. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश आलीवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रुपेश आठवलेविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुरनं ४१/२०२१ कलम ५०१, ५०५(२) भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करणाऱ्या व्यक्तीवर सोशल मिडीया मॉनिटरींग सेल, पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत बारकाईने नजर ठेवणे सुरु आहे. नांदेड जिल्हयातील नागरिकांनी आक्षेपार्ह व अफवा पसरविणारे व्हिडीओ, पोस्ट प्रसारित करु नयेत किंवा खातरजमा न करता वेगवेगळया समूहात पाठवू नयेत. असे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!