Share

सुशांतसिंहच्या बहिणीच्या विरोधातील गुन्हा रद्द होणार नाही : हायकोर्ट

Published On: 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह याला चुकीच्या औषधोपचारांचा सल्ला दिल्या प्रकरणी सुशांतची बहिण प्रियांकासिंह हिच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

अभिनेत्री रिहा चक्रवर्ती हिने सुशांतसिंहच्या दोन बहिणींच्या विरोधात बांद्रा पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्याचा तपास केल्यानंतर पोलिसांनी या दोन बहिणी अणि दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रूग्णालयातील डॉक्‍टर तरूणकुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सुशांतची मानसिक अस्वस्थता कमी व्हावी म्हणून त्याला चुकीची व बनावट प्रिस्क्रीप्शनची औषधे घेणे भाग पाडले होते असे रिहा चक्रवर्ती हिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

तथापि उच्च न्यायालयाच्या एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने सुशांतची दुसरी बहीण मीतू सिंह हिच्यावरील याच स्वरूपाच गुन्हा मात्र रद्द करण्याची अनुमती दिली आहे. प्रियांका सिंह हिच्या विरोधात सकृत दर्शनी पुरावा आहे असे कोर्टाने म्हटले आहे. मात्र मीतू सिंह हिच्या विरोधात मात्र कोणताही असा पुरावा आढळत नाही असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.

या दोन बहिणींनीच सुशांत याला त्याच्या अस्वस्थपणाबद्दल चुकीचे मेडिकल प्रिस्क्रीप्शन दिले आणि त्याला त्यांनी चुकीची औषधे घ्यायला लावली म्हणून मुंबई पोलिसांनी त्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. तो रद्द करावा या मागणीसाठी दोन्हीं बहिणींनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर कोर्टाने वरील निकाल दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!